पंढरपुरातील विकासकामांसाठी मिळणार 5 कोटी रूपयांचा निधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 1, 2022

पंढरपुरातील विकासकामांसाठी मिळणार 5 कोटी रूपयांचा निधी

पंढरपुरातील विकासकामांसाठी मिळणार 5 कोटी रूपयांचा निधी

पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवकचे श्रीकांत शिंदे यांची मागणी

            पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- पंढरपूर शहरातील विकासकामांसाठी निधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी पर्यटन राज्यमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याकडील खात्याकडून निधी घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ना.तटकरे यांच्याकडे पंढरपूर शहरातील जिजामाता व पद्मावती उद्यानासाठी 5 कोटी रूपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली त्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून श्रीकांत शिंदे यांच्या मागणी पत्रावर  सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी  माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिली.

            पंढरपूर शहरात जिजामाता व पद्मावती हे उद्यान असून या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असल्याने ही उद्याने असून अडचण नसून खोळंबा अशी बनलेली आहेत. या ठिकाणी असलेल्या वस्तू, खेळणी, रेल्वे गाडी मोडकळीस आल्या आहेत याबाबत नागरिकांनी वारंवार नगरपरिषदेकडे मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते. यामुळे यामुळे अबाल वृध्दांना, महिला- भगिनी, लहान मुलांना बागेमध्ये जात येत नाही. 

            याबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी सदरचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तळमळीने प्रयत्न करण्यास सुरूवात केली असून सुरूवातीला सदरची बाब त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली व सदरची दोन्ही उद्याने चांगल्या सुस्थितीत आल्यास पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर पडेल व नागरिकांना ही त्याचा चांगल्या प्रकारे ही लाभ होईल याचा परिणाम वारंवार आर्थिक अडचणीत सापडलेल्या पंढरपूर नगरपरिषदेला उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण होणार आहे व विकासकामांसाठी निधी ही याच माध्यमातून नव्याने उभारता येणार आहे ही बाब ना.पवार यांच्या पटवून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सदरच्या उद्यानांसाठी पर्यटन विभागाकडून निधी घ्यावा अशी सूचना दिल्या. त्यानंतर पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदन देवून सदरची बाबी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ सदरच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देवून जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे पंढरपूर शहरातील अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages