12 वीत नापास झाल्यानेविद्यार्थ्याची आत्महत्या ; नापास झाल्याने आयुष्य संपते का? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

12 वीत नापास झाल्यानेविद्यार्थ्याची आत्महत्या ; नापास झाल्याने आयुष्य संपते का?

12 वीत नापास झाल्यानेविद्यार्थ्याची आत्महत्या ; नापास झाल्याने आयुष्य संपते का?

              पुणे (कटुसत्य वृत्त): पुणे 10 वी 12 वी म्हणटल की थोडी,भीती,थोडी, उत्सुकता, एकाच वेळी असे अनेक प्रश्न मनामध्ये सुरू असतात. त्यात पास झाले की जल्लोष ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असतो.पण काही वेळा विद्यार्थी नापास झाले की इतके खचतात की आत्महत्या त्यांना सोपी वाटू लागते. बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी 12 वी चे ऑनलाईन निकाल लागले.काही पास तर काही नापास झाले पण यात धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये घडली. निखिल लक्ष्मण नाईक ,वय 19, रा श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्याचे समजताच ईमारती वरून उडी मारून आत्महत्या केली.निखिल हा गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. बारावीत ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर 12 वी चा निकाल लागणार मी पास होणार यासाठी तो खुपचं उत्सुक होता.

              दुपारी 1 चा सुमारास ऑनलाईन निकाल लागला निकाल पत्रिकेत नापास झाल्याचे समजतात तो इमारतीच्या वरचा दिशेने जाऊन वरून उडी मारली.खाली उभ्या असलेल्या शेखर लहू लोणारे वय,30 यांचा अंगावर पडला यामध्ये लोणारे हे जखमी झाले.लोणारे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल कण्यात आले.

              निखिल ला क्रिकेट ची खूप आवड होती.तो शांत व मनमिळावू स्वभावाचा होता,निखिल चे वडील आचारी तर आई घरकाम करते. निखिलच्या जाण्यामुळे आई वडीलांना मोठा धक्का बसला आहे. कष्टकरी कुटुंबातील आशेचा किरण असलेला तरुण मुलगा गेल्याने सर्वच भाऊक झाले आहे. निखिलच्या जाण्यामुळे श्रावणधारा वसाहती मधील महिलांनी दुःख व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages