आयुक्तालयातील सात पोलीस ठाणे व अन्य विभागातील एकूण ३६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आयुक्तालयातील सात पोलीस ठाणे व अन्य विभागातील एकूण ३६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून मुख्यालयात असलेल्या ६८ कर्मचाऱ्यांची सुटका झाली असून त्यांच्या इतरत्र नियुक्त्या झाल्या आहेत, तर १३ जणांना त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी अभ्यासपूर्ण केलेल्या बदल्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ एन (२) मधील तरतुदीनुसार एकाच ठिकाणी विहीत कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अंमलदार यांची रिक्त पदे, पसंती क्रमांक यांचा सांगोपांग विचार करून केल्या आहेत.बदल्या आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील २० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर चार जणांना मुदतवाढ दिली आहे. गुन्हे शाखेतील २० जणांच्या बदल्या झाल्या आहेत,एकाला मुदतवाढ दिली आहे.शहर वाहतूक शाखेतील ११ जणांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यातील ८ जणांना पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले आहे. सायबर सेलच्या चार जणांना मुदतवाढ दिली आहे. महिला कर्मचाऱ्याला मुख्यालयात पाठवले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे ४, विशेष शाखेचे २ तर सुरक्षा शाखेच्या दोघांची बदली झाली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यातील २७ जणांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. जेलरोड पोलीस ठाण्यातील १८ जणांची बदली झाली आहे.जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील १७ जणांची बदली करण्यात आली असून ५ जणांना मुख्यालयात पाठवले आहे.त्यापैकी ७ जणांची रवानगी पोलीस मुख्यालयात झाली आहे.फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील २५ जणांच्या बदल्या झाल्या असून दोघांना मुख्यालयात पाठवले आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यातील १४,सदर बझार पोलीस ठाण्यातील २२ बदल्या झाल्या, त्यापैकी १३ जणांना मुख्यालय देण्यात आले आहे.सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील ८ जणांच्या बदल्या झाल्या त्यातील एकाला मुख्यालयात पाठवले आहे.
0 Comments