Hot Posts

6/recent/ticker-posts

अपंग आणि महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसू नये

अपंग आणि महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसू नये

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एसटी महामंडळाच्या नियमानुसार महिलांसाठी प्रत्येक एसटीत दोन जागा आरक्षित असतात. मात्र या जागांवर गर्दी असताना अनेकदा पुरुष बसतात आणि महिलांना आरक्षण असतानाही उभे राहावे लागते. अशा तक्रारी सध्या महिला करत आहेत. त्यामुळे सोलापूर आगाराने पुन्हा एकदा सर्व वाहक आणि चालक कर्मचाऱ्यांना महिलांच्या जागेवर जर कोणी पुरुष बसत असतील तर त्यांना नियमावली समजावून सांगा आणि महिलांच्या तक्रारी असतील तर थेट गाड्या पोलिस ठाण्यात न्या, अशी सूचना दिली आहे. मात्र या जागांवर अनेकदा त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती नसतात. त्यांना उठायला सांगितल्यास बऱ्याचदा वाद होतो. अपंग आणि महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसू नये, अशा सूचना वारंवार करण्यात येतात. पण गर्दीमुळे नियमांचे पालन होत नाही. एसटीच्या ४२ जागांपैकी १३ जागा या आरक्षित असतात. त्यात अपंग, गरोदर माता, महिलांसाठी दोन जागा, ज्येष्ठ नागरिक, आमदार, खासदार, अधिस्वीकृतीधारक पत्रकार अशा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.त्यामुळे एसटीतील वाहकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे एसटी प्रशासनाने बजावले आहे. त्यामुळे आता महिलांना व इतर आरक्षणधारकांना त्यांच्या जागेवर बसण्याची सुविधा मिळणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments