Hot Posts

6/recent/ticker-posts

झाडूवाल्यांच्या बदल्या गैरसोयीच्या ठिकाणी केल्या त्या त्वरित रद्द कराव्या

झाडूवाल्यांच्या बदल्या गैरसोयीच्या ठिकाणी केल्या त्या त्वरित रद्द कराव्या

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कामगार संघटनेने निदर्शने करून आयुक्तांना दिले निवेदन पालिकेने रोड स्वीपर आणल्याने झाडूवाल्यांच्या बदल्या गैरसोयीच्या ठिकाणी केल्या आहेत. त्या त्वरित रद्द कराव्या, यासह सात मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका आयुक्तांच्या दालनासमोर बुधवारी सकाळी निदर्शन करण्यात आली.महापालिका कर्मचाऱ्यांना लाड पागे कमिटीची शिफारसी लागू कराव्यात, बालवाडी व अंगणवाडी सेविकांना त्वरित मुदतवाढ मिळावी, परिवहनमधील कर्मचाऱ्यांची पालिकेतील नियुक्ती त्यांच्या सेवेच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी. कायम सेवकांची यादी तयार करून त्यांना त्वरित नियुक्ती द्यावी, सेवानिवृत्त सेवकांच्या पाल्यांना सेवेत घेतले पाहिजे. बालवाडी सेविकांना मानधनात हजार रुपये वाढ करावी. स्वीपर मशीनमुळे झाडूवाल्यांच्या बदल्या केल्या. त्यांच्या बदल्या त्याच प्रभागात करण्यात याव्यात, आदी मागण्यांसाठी धरणे धरण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments