Hot Posts

6/recent/ticker-posts

हातभट्टी दारू अड्डयावर छापा टाकून दीड हजाराची दारू जप्त

हातभट्टी दारू अड्डयावर छापा टाकून दीड हजाराची दारू जप्त

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भवानी पेठ मराठा वस्ती येथे शिवगंगा मंदिराजवळ सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्डयावर छापा टाकून दीड हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे.या प्रकरणी दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नागनाथ कोंडिबा बामणे (वय ४६, रा. मराठा वस्ती),रमेश चव्हाण (रा. बक्षीहिप्परगा)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २४ मे रोजी दुपारी २.४० वाजता कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या महिला पोलीस नाईक शिलावती बाबासाहेब काळे यांनी फिर्याद दिली असून, तपास पोलीस नाईक आरेनवरू करीत आहेत. 

Reactions

Post a Comment

0 Comments