Hot Posts

6/recent/ticker-posts

मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलिसांनी हेरले

मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलिसांनी हेरले

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लपूनछपून मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलिसांनी हेरले.त्यानंतर फौजदार चावडी,एमआयडीसी, जोडभावी पेठ, सदर बझार पोलिसांनी अचानक छापे मारत ठोस कारवाई केली. या कारवाईत ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनराज पान दुकानावर धाड टाकून कृष्णा शंकर क्षीरसागर (वय ४६, रा.निराळे वस्ती), विजय देवकर (रा. लोभा मास्तर चाळ), हॉटेल बालाजी समोर मटका घेणाऱ्या दिगंबर पांडुरंग चव्हाण (वय ५४, रा. धमरशी लाईन), गणेश (पूर्ण नाव नाही), सुनील नगर येथे रमेश भीमराव चारगुंडी (वय ५८, रा. सुनील नगर), महेश (पूर्ण नाव नाही), विणकर वसाहतजवळील धाडीत प्रकाश विठ्ठल भीमाशंकर वाघे (रा. यल्लालिंग मठाच्या बाजूला), राकेश कोळी (रा. सोलापूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली.हद्दीत उळागड्डे राईस मिलच्या बोळात लक्ष्मण सिद्राम पांढरे (वय ५६, रा. भवानी पेठ), श्रीकांत जिरपे, दीपक जाधव (रा.सोलापूर). बाळीवेस स्टेट बँकेच्या बाजूला राजू मोतीलाल भालेराव (वय ४६, रा. बुधले गल्ली, बाळीवेस), श्रीकांत, बाबा गुंड (रा. सोलापूर) यांच्यावर कारवाई झाली. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत नळबाजार चौक, बेडर पुलाजवळ सुभाष विजयसिंग मन्सावले वय ३३, रा. सदर बझार), जुबेर ढालायत नफॉरेना सांगातर कारवार्ट झाली. सात रस्ता येथील बस डेपोच्या पाठीमागे महिबुब रशिद शेख (वय ३८, रा. कुमठा नाका), जुबेर ढालायत (वय ५०, रा. फॉरेस्ट) यांच्यावर कारवाई झाली. लष्कर नळ बझार चौक येथे रोहित संजय वाघमारे (वय २७, रा. जवाहर नगर), जुबेर ढालायत (वय ५०) यांच्यावर कारवाई झाली. हुमा मेडिकलच्या बाजूला चंद्रशेखर शंकर कोळी (वय ३०, रा. शास्त्री नगर), जुबेर ढालायत (वय ५०, रा. फॉरेस्ट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments