शंभरकर यांनी संबंधित वित्त कंपनीला एनओसी देण्याची सूचना केली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सात रस्ता येथील एका वित्त कंपनीच्या चुकीमुळे सोलापुरातील ३७ युवकांना बँकांकडून एनओसी मिळेना.एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने संबंधित युवकांना दुसऱ्या बँकेकडून मंजूर झालेले कर्ज रक्कम देखील बँकेतून काढता येईना. तक्रारीची दखल घेत शंभरकर यांनी संबंधित वित्त कंपनीला एनओसी देण्याची सूचना केली.सात रस्ता येथील वित्त कंपनीच्या कार्यालयासमोर बुधवारी शिंदे तसेच पवार यांनी गोंधळ घालून कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.कार्यालयाला कुलूप ठोकून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. याबाबत मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे तसेच सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार केली.दिवसभर या विषयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.याबाबत अधिक माहिती संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून कर्जे मंजूर केल्याचे मान्य केले. संबंधितावर २०२० मध्ये सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.एकूण २२ युवकांच्या नावावर बुलेट गाडी व इतर दुचाकी वाहनांसाठी कर्ज दाखवून कर्ज रक्कम वित्त कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाटली. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने संबंधितांना एनओसी देता येईना,असे अधिकाऱ्यांनी कंपनीच्या सांगितले.
0 Comments