महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दुय्यम वागणूक : पिरिप कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचा आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 21, 2022

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दुय्यम वागणूक : पिरिप कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचा आरोप

 महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दुय्यम वागणूक :  पिरिप कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचा आरोप

सर्व घटक पक्षांची महाविकास आघाडीत रहावे की बाहेर पडावे आणि पुढील वाटचालीसाघी लवकरच विशेष बैठक बोलवणार

             मुंबई (नासिकेत पानसरे): महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नेहमीच सर्व घटक पक्षांना दुय्यम दर्जाची वागणूक तिनी पक्षांकडून मिळत आहे. तिन्ही पक्षांनी घटक पक्षांची वेळीच दखल घेतली नाही, तर महाविकास आघाडी मधील 40 पेक्षा जास्त असलेले पक्ष महाविकासआघाडी तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील असा झणझणीत इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

             युती सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील 40 पेक्षा जास्त पक्षांना सोबत घेऊन युती सरकारच्या विरोधात बिगुल फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राज्यव्यापी तब्बल चार महायात्रा (दौरे) पीपल्स रिपब्लिकन पार्टी  ला सोबत घेऊन काढले.  काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षात युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची सात घेतली मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत आहे, असा आरोप करीत 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला हे सुद्धा काँग्रेसने विसरू नये असा सूचक टोलाही यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी लावला.

              2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी असल्यामुळेच काँग्रेसचे मोजके आमदार निवडून आले, हे काँग्रेसने विसरू नये. फुले,शाहू, आंबेडकरी विचारांच्या मतांसाठी कॉंग्रेस निळ्या झेंड्याचा वापर करीत असेल तर 2019 ची निवडणूक काँग्रेस नी लक्षात घ्यावी, असेही पीरीपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगितले. महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची विशेष बैठक बोलावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडी तून बाहेर पडावे की नाही आणि पुढील वाटचाल काय यावर निर्णय घेतला जाईल असा इशारा यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages