पालकमंत्री अदिती तटकरे कडुन मोहम्मद अयाज यांचा गौरव

गायक मोहम्मद अयाज सोलापूर चे नांव जगभर प्रसिद्ध केले - पद्मश्री / खासदार विकास महात्मे
मुंबई (कटुसत्य वृत्त):- नुकतेच गायक मोहम्मद अयाज हे दक्षिण आफ्रिका येथील सांगीतिक दौरा करून आले. आपल्या संगीत कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या सोलापूर व देशाच नावं लौकिक केले. एक शेतकरी कुटुंबातील हा गायक कलावंत आपल्या सांगीतिक प्रवास करत असताना अनेक खडतर परिस्थितीचा सामना केला जो अतिशय खडतर होता कधी ही न डगमगता आपला सांगीतिक प्रवास सुरू ठेवला वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहीनींवर गायन स्पर्धा जिंकली संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मनात व महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनात अयाज आपली ओळख निर्माण केलेली या साठी पञकार बंधू आणि संपूर्ण मीडियाला हा श्रेय जातो अस अयाज सांगितले . गेले दोन वर्षे कोराना काळात अनेक वेळा कार्यक्रम अभावी ञास सहन करावा लागला. या कोरोना काळात अनेकांनी मदत साठी पुढे आले पण अयाज यांनी मदत नाकारली खचुन न जाता पुन्हा नव्याने कार्यक्रम करण्यास सुरुवात केली कोरोना नंतर हा पहिलाच दौरा होता जो अतिशय छान पार पडला या स्वाभिमानी कलावंताचा सन्मान मुंबई येथे करण्यात आला या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे, रुपाली चाकणकर (अध्यक्ष महाराष्ट्र महीला आयोग) पद्मश्री तथा खासदार विकास महात्मे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
0 Comments