Hot Posts

6/recent/ticker-posts

शेत मजुर महिलेचा प्रामाणिकपणा, शेतात पडलेली सोन्याची अंगठी दिली परत

शेत मजुर महिलेचा प्रामाणिकपणा, शेतात पडलेली सोन्याची अंगठी दिली परत 

             माढा  (कटूसत्य वृत्त):- शेतात काम करित असलेल्या शेतमजूर महिलेने  सापडलेली  सोन्याची अंगठी  प्रामाणिकपणे परत दिली. माढा तालुक्यातील उपळाई(बुद्रुक)गावात ही घटना घडली. लता दत्तात्रय आखाडे( रा. उपळाई (बुद्रुक) ता.माढा) असं त्या प्रामाणिकपणा दाखवलेल्या शेत मजुर महिलेचं नाव आहे.

             राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालूकाध्यक्ष संदीप गोरे यांच्या आई  इंदुमती गोरे यांची  डाळिंब बागेत ८  ग्रॅम वजनाची ४० हजार  रु.किंमतीची अंगठी हरवली होती.दोन दिवस शोधा शोध केली  असता ती सापडली नाही.

             दोन दिवसानंतर बागेत महिला काम करत असताना लता दत्तात्रय आखाडे यांस ती अंगठी सापडली व त्यांनी  कोणतीही अपेक्षा न बाळगता  प्रामाणिक पणे ती परत केली.सध्याच्या मतलबी युगात देखील  लता आखाडे यांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments