कुर्डूवाडीत सांगली अर्बन को-ऑप.बँकेचा ग्राहक मेळावा संपन्न
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- सांगली अर्बन को-ऑप बँके च्या कुर्डूवाडी शाखेचा ग्राहक मेळावा दि.१८ मे रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ बँकेचे संस्थापक स्व.अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दिप प्रज्वलन करून झाली.
यावेळी बँकेचे चेअरमन गणेशराव गाडगीळ,व्हा.चेअरमन एच.वाय.पाटील,संत कुर्मदास सह.साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदराव कुलकर्णी,ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर,डॉ.संतोष सुर्वे,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक,शाखा सल्लागार समितीचे राजकुमार धोका,अमोल कुलकर्णी, ॲड.सौरभ चिंचवडकर,एस.ए.हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक पालक संचालक श्रीकांत देशपांडे यांनी केले.यांनतर बँकेचे खातेदार संतोष दोशी व आप्पासाहेब बनसोडे,प्रशांत भंडारकवठेकर,सुरेश पवार,मधुकर भोसले यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विशेष शैक्षणिक प्राविण्याबद्दल( B.Tech) मॅकेनिकल इंजिनियर पदवी संपादन करुन टाटा आय.क्यू मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून पदावर असणारे सर्वेश सुर्वे व नीट परीक्षेत ५९५ गुण मिळवून शाहु मेडिकल कॉलेज,कोल्हापूर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल यश सुर्वे यांचा बँकेच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला. विवेक काशीद आणि संतोष बागल यांना गणेश गाडगीळ यांच्या हस्ते क्यु.आर कोडचे वाटप करण्यात आले. यानंतर ग्राहक खातेदार दादासाहेब साठे, धनंजय डिकोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कुर्डूवाडी शाखेने विनम्र व तत्पर सेवेचा वारसा जपला आहे असे मनोगत यावेळी ग्राहकांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना गणेश गाडगीळ म्हणाले “आम्ही सात वर्षापुर्वी सत्तेवर आलो त्यावेळी आम्ही कर्ज वसुलीबाबत ठोस कार्यवाही करून न्यायप्रविष्ट बाबी पूर्ण करून जुन्या कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले, आणि बँकेच्या आर्थिक परिस्थितित सुधारणा करून पाया भक्कम करून घेतला. बँकेला झालेल्या नफ्या पैकी बहुतांशी रक्कम ही एन.पी.ए तरतुदीसाठी वापरावी लागली. कोरोनामुळे इतर क्षेत्राप्रमाणेच बँकिंग क्षेत्रालाही मोठ्या मंदीचा सामना करावा लागला आहे. या सर्व आव्हानात्मक परिस्थीतीतही आमचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी जिद्दीने काम केले. आम्ही दिलेल्या आश्वासनापैकी बहुतांश बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. यात टप्याटप्याने शाखा नुतनीकरण, सी.बी.एस प्रणाली, ए.टी.एम सुविधा, क्यु.आर कोड सुविधा सुरु करण्यात आल्या. शैक्षणिक कर्ज, वाहनकर्ज, गृहकर्ज, धन्वंतरी कर्ज योजना, उद्योजकांसाठी एम.एस.एम.ई अंतर्गत कर्ज योजना, शुभ मंगल कर्ज योजना, सोने तारण कर्ज अशा विविध प्रकारातून आम्ही सर्व घटकांना कर्जपुरवठा करत आलो आहोत.
यावेळी संचालक सागर घोंगडे, शाखाधिकारी प्रवीण बुडुख तसेच कुर्डूवाडी शाखेचे ग्राहक तसेच १५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष एच.वाय. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन शाखा सल्लागार संजय बागल यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाखाधिकारी प्रवीण बुडुख, पद्माकर सौदीकर, रवींद्र मोहोळकर, प्रदीप कुलकर्णी, सत्यवान माळी, प्रदीप गोसावी, तुषार शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments