माढा पोलिस स्टेशन चा दुरध्वनी(लॅन्ड लाईन)अजुनही आऊट ऑफ सर्व्हिसच,बि.एस.एन.एल विभागाचा गलथान पणा समोर

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा पोलिस स्टेशन चा दुरध्वनी गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच स्थितीत आहे.पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी फोन बंद असल्याची तक्रार करुनही बि.एस.एन विभागाने दुरध्वनी सुरु केलेला नाही.त्यामुळे बिएस.एन.एल विभागाचा गलथान कारभार या निमित्ताने समोर आला आहे.
माढा पोलिस स्टेशन च्या हद्दीच्या गावातील नागरीकांना काही तक्रार असल्यास संपर्क कसा साधायचा असा प्रश्न उपस्थित झालाय.गुरुवारी सायंकाळी तर बंद स्थितीत शोभेच्या बाहुली समान ठाणे अंमलदार यांच्या टेबल वर असलेल्या दुरध्वनी ला/लॅन्ड लाईन वर फुले ठेवले असल्याचे चित्र दिसुन आले.
त्यामुळे बिएस.एन.एल विभागाला दुरध्वनी सुरु करण्याचे गाभिर्य कधी येणार ? हे पहावे लागणार आहे.
या संबधी विचारणा करण्यासाठी टेभुर्णी विभागाच्या बिएस.एन.एल विभागातील संबधित दिपक किर्ते यांना ९४२०५६३२९१ या क्रमांकावर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
0 Comments