Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनीचे पाणी चोरणार्यांचे कारस्थान धुळीस मिळवणार...

उजनीचे पाणी चोरणार्यांचे कारस्थान धुळीस मिळवणार...

राज्य सरकारचे विसर्जन करूनच शेतकऱ्यांचा आक्रोश थांबेल
भाजपा व मित्र पक्ष शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी - देवेंद्र फडणवीस

             बेंबळे (कटुसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे असलेले उजनी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यात पळवण्याच्या स्वार्थी धोरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उद्योजक यांच्या सहित सर्व सामान्य माणूस प्रचंड अडचणीत येणार आहे परंतु भाजपा सहित रयतक्रांती संघटना व इतर मित्र पक्ष या पाणी चोरांचे कारस्थान धुळीस मिळवल्या शिवाय व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टेंभुर्णी तालुका माढा येथे 'जागर महाराष्ट्राचा: आक्रोश शेतकऱ्याचा' या अभियानाच्या समारोप प्रसंगी केले आहे.

             वृत्तांत असा की माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी 'जागर महाराष्ट्राचा आक्रोश शेतकऱ्याचा' हे अभियान 29 एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले व त्याची सुरुवात जालना पासून केली तर समारोप टेंभुर्णी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार समाधान आवताडे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आ. गोपीचंद पडळकर आ. राहुल कुल आमदार राजाभाऊ राऊत आमदार राम सातपुते धैर्यशील मोहिते-पाटील भाजप जिल्हाअध्यक्ष श्रीकांत देशमुख शिवाजी कांबळे प्रणव परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते .माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले की महा विकास आघाडीचे सरकार फक्त घोषणा करून शेतकऱ्याची दिशाभूल करत आहे. अतिवृष्टी चक्रीवादळ गारपीट आदी नैसर्गिक आपत्ती वेळी हजारो कोटीचे पॅकेज देणार अशी घोषणा केली पण प्रत्यक्षात अंमलबजावणी वेळेवर करण्यात आली नाही,. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणाले परंतु ही शुद्ध धूळफेक केली, दारूधंदे बार मालक यांच्या टॅक्समध्ये सवलती दिल्या जातात परंतु शेतकऱ्यांचे वीज बिल पाणीपट्टी सक्तीने वसूल केली जाते ,या सरकारला... लाज असेल तर जाग येईल ....अन्यथा शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही .

             फडणवीस पुढे म्हणाले की त्रिशंकू सरकार वसुली करणारे व लुटारू सरकार आहे सहकारी साखर कारखाने बंद पाडायचे व पुन्हा स्वतः विकत घ्यायचे, शेतकऱ्यांच्या ठिबक संच व शेततळे अनुदान योजना बंद केल्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वामीनाथ आयोग लागू केला शरद पवारांना सत्य माहीत आहे परंतु ते याचं श्रेय लाटण्याचा महाराष्ट्रात खोटा प्रयत्न करतात. सहकारी सोसायट्यांना प्राधान्य नाही, पणन व्यवस्था संपवली, समृद्धी योजना बारगळली, गट शेती बंद केली फक्त सध्या एकच चालू आहे व ते म्हणजे' द्या दान (लाच): घ्या अनुदान' परंतु भाजप व मित्र पक्ष शेतकऱ्याच्या मागे पूर्णक्षमतेने असून शेतकरी राहिला तर देश राहील ,देश जगेल ...देश वाचेलः याची सत्ताधाऱ्यांना जाणीव करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आम्ही शेतकऱ्यांची कधीही दैना होऊ देणार नाही. फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्र्यांना एक जबाबदारी आहे ती म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि स्वतःचे घर पैशाने भरी.. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे, उसाच्या वजनातील काटा मारणे थांबले पाहिजे, साखर सम्राटांची सामंतशाही बंद झाली पाहिजे तरच उस- शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. यापूर्वी आम्ही हेच करत होतो व भविष्यातही याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही .आपल्या प्रभावी भाषणाचा समारोप करताना फडणीस म्हणाले की रयत क्रांतीच्या अभियानाचा समारोप असला तरी आंदोलनाने व शेतकऱ्यांच्या आक्रोशाने या लुटारू भ्रष्टाचारी व अपयशी सरकारचे विसर्जन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही., शेवटी ते म्हणाले की ...

"पानीसे जो नहाता है वह कपडे बदलता है।
मगर जो पसीनेसे नहाता है वह किसान
इतिहास बदलता है ।"...

             या कार्यक्रमाच्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर खासदार रणजीत निंबाळकर हर्षवर्धन पाटील दीपक भोसले सागर खोत शंकर वाघमारे अनिल पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करून  शेतकऱ्यावरील अत्याचारी भ्रष्टाचारी अन्यायकारक प्रश्नाला वाचा फोडून व सरकार भ्रष्टाचारी  महा 'भकास'आघाडीचे असून या लुटारू सरकारच्या अपयशाचा पोलखोल करून दाखवला आणि हे सरकार संपवणे ही काळाची गरज असल्याचे आवर्जून सांगितले.

             प्रारंभी देवेंद्र फडणीस यांचे व्यासपीठावर जल्लोषात स्वागत करण्यात आले, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलना आंतर माढा तालुका भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे यांनी सर्वांचे स्वागत करून टेंभुर्णी शहर नगरपंचायत व्हावी यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली .रयत क्रांती चे जिल्हा समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या जिल्ह्यात ऊस ,पाणी ,वीज,शिक्षण, आरोग्य, रस्ते व इतर सर्व सामान्य  बाबत शासनाकडून शेतकरी व सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाचे सविस्तर विवेचन केले. या सभेला सहा ते सात हजार  नागरिकांचा जमाव उपस्थित होता. सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी केले तर आभार दीपक भोसले यांनी मानले .

Reactions

Post a Comment

0 Comments