Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार च्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार च्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त अश्विनी सहकारी रुग्णालय व संभाजी आरमार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१५ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी स्टेशन ता.दक्षिण सोलापूर येथे "भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

              प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे सभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.

              यावेळी संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे,जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे,अश्विनी सहकारीरगणालयाचे डॉ.कुलकर्णी, डॉ.शुभम लांबतुरे विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, होटगी स्टेशन येथील उपसरपंच सुभाष पाटोळे,ग्रा.प.सदस्य निसार कांबळे, अल्ट्राटेक सिमेंट चे आरोटे साहेब, काँग्रेस दक्षिण तालुका प्रमुख सिद्राम धायगोडे,युवराज रजपुत,सुनील काळे,चिदानंद बंडगर,अर्जुन धायगोडे,शशिकांत गायकवाड,राजकुमार हडपद,मयूर धायगोडे,प्रथम वावरे उपस्थित होते.

              आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या  गोरगरीब  नागरीकांना या शिबिराचा लाभ व्हावा याच हेतूने संभाजी आरमार सामाजिक जाणिवेतून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे असे यावेळी अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

              या शिबिराचे नियोजन संभाजी आरमार चे जिल्हाउपप्रमुख प्रमोद जगताप,दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे,उपप्रमुख राजशेखर बोरेगाव यांनी तर शिबिर यशस्वी करण्यासाठी शशिकांत पटणे,हकीम मुल्ला,संतोष  गायकवाड,  नितीन  ढोणे, सोमनाथ  पटणे, कुणाल  टक्के, विलास  कदम,मुस्तफा शेख,परम बगले, जाफर पटेल, आरविद ढोणे,दयानंद  बंडगर, प्रसन्न  शिंदे, संजय  जगताप, मल्हारी डोहाळे अविनाश  शिगाडे, सोनू ढोणे यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments