आम आदमी पार्टी ने केले सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस कुंकूम मिश्रित जलाभिषेक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 18, 2022

आम आदमी पार्टी ने केले सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस कुंकूम मिश्रित जलाभिषेक

आम आदमी पार्टी ने केले सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस कुंकूम मिश्रित जलाभिषेक

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज दिनांक 18/05/2022 रोजी सोलापूर आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या इंदापूर, बारामती ला पाणी नेण्याच्या निर्णयाचा निषेध करत घागरी वाजवत तसेच पालकमंत्र्यांच्या प्रतिमेस कुंकूम मिश्रित जलाभिषेक करण्यात आला.

           यावेळी पदाधीकारी बोलताना म्हणाले सोलापूरचा पाणी प्रश्न एवढा गंभीर असताना देखील याचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. आधी सोलापूरला दररोज मोफत 700 लिटर पाणी पुरवा आणि मग देशभर कुठेही पाणी न्या असं मत व्यक्त केले.

           यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री adv सागर पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष खतीब वकील, जिल्हाउपाध्यक्ष अतिश गायकवाड, जिल्हासंघटक आनंद जाधव, शहर उपाध्यक्ष जैनोद्दीन शेख, अशोक होटकर, मल्लिकार्जुन पिलगेरी, मदणी जफर, निलेश संगेपाग,अजय जाधव, विनायक पवार, सचिन व्हनमाने आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages