अकलूजच्या गृहविज्ञान महिला महाविद्यालयास ' नॅक ' चा ' अ ' दर्जा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषद, बेंगलोरच्या त्रिसदस्यीय तज्ञ समितीने शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयास 3.02 गुणांसह अ दर्जा दिल्याचे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी सांगितले.
नॅकच्या तज्ञ समितीने दिनांक ९ व १० मे रोजी महाविद्यालयास भेट देऊन विविध सुविधा व उपक्रमांबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले होते.त्रिसदस्यीय समितीत छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील हेमचंद यादव विद्यापीठाच्या कुलगुरू व समितीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा पलटा,नवी दिल्ली येथील जमिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक व समितीचे समन्वयक सदस्य डॉ. मोहम्मद शफिक,हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील आय.जी.एन.महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या व समितीच्या सदस्या डॉ.प्रेम कुमारी गुप्ता यांचा समावेश होता.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे व सर्व संचालक मंडळ यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाच्या या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे,आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.भारती भोसले,प्रा.अमित घाडगे, डॉ.छाया भिसे,डॉ. राजश्री निंभोरकर,डॉ.ऋषी गजभिये,डॉ.जयशीला मनोहर,प्रा.के.के.कोरे,प्रा.राहुल चव्हाण,कार्यालय अधिक्षक विजय कोळी,महादेव जाधव,सादिक झारेकरी,दिपक शिंदे,बाळू पवार,दिपा यांजडे,रेखा धोत्रे व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments