Hot Posts

6/recent/ticker-posts

रुक्मिणी मातेच्या मूर्तीला वज्रलेप करणाऱ्यावर कारवाई व्हावी - सुधाकर इंगळे महाराज

रुक्मिणी मातेच्या मूर्तीला वज्रलेप करणाऱ्यावर कारवाई व्हावी - सुधाकर इंगळे महाराज

             सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर मुख्य मंदिरातील मूर्ती वज्रलेप संदर्भात रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पायाला दुरुस्ती करावी लागेल, असे मंदिर समिती कडून जाहीर करण्यात आले आहे. या अगोदर मूर्ती वज्रलेप करताना केलेला करार मंदिर समिती पंढरपूर यांनी प्रसिद्ध वृत्तपत्रातून जाहीर करावा. त्या करारा नुसार मूर्तीलेप आयुष्य - कालावधी, मंदिर समितीने घातलेले नियम व अटी पूर्णपणे तपासून घेऊन ते प्रसिद्ध करावेत.ज्यांच्या बरोबर करार केला त्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून कडक कारवाही करणेत यावी.

             तसेच मूर्ती वज्रलेप या कारणासाठी भाविकावर, दर्शना वर, नित्यनेमावर अन्याय होऊ नये. या संबंधी वारकरी संघटना बरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा असे मा. मुख्यमंत्री यांना सुधाकर इंगळे महाराज यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे वतीने ईमेल द्वारे कळवण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments