शैक्षणिक उपक्रमात अमुलाग्र बदल करण्यासाठी रणपिसे क्लासेस कडून बेसिक कन्सेप्ट डे जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

शैक्षणिक उपक्रमात अमुलाग्र बदल करण्यासाठी रणपिसे क्लासेस कडून बेसिक कन्सेप्ट डे जाहीर

शैक्षणिक उपक्रमात अमुलाग्र बदल करण्यासाठी रणपिसे क्लासेस कडून बेसिक कन्सेप्ट डे जाहीर

            माणगांव (कटुसत्य वृत्त): दिनांक 29/5/2022 रोजी रणपिसे क्लासेसच्या माध्यमातून बेसिक कन्सेप्ट डे ची घोषणा करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात तसेच विषयासंबधी आवड निर्माण व्हावी यासाठी या विविध कार्यक्रम राबाविण्याचा मानस संचालक रणपिसे सरांनी प्रस्तावानेत स्पष्ट केला. तसेच कोरोना काळातील शैक्षणिक नुकसान ही आज शिक्षण क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी सुद्धा बेसिक कन्सेप्ट डे या कल्पनेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या संकल्पनेचा शुभारंभ आज रायगड भुषण ऍडव्होकेट परेश जाधव सर तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे, तसेच अगीवले सर, रणपिसे मॅडम वा साखरे सर यांच्या उपस्थित साजरा झाला. विदयार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच उत्साह हा कार्यकर्माचे वैशिष्ट् होते.      

            कार्यकामावेळी परेश सरांनी विविध दाखले देत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच रणपिसे सरांनी 20 वर्षापुर्वी केलेल्या चिन्हाची कवितेची आठवण करून दिली. तसेच विदयार्थ्यांना गणित विषय सोपाकरण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत हे सांगितले. बेसिक कन्सेप्ट बद्दल बोलताना ही अतिशय आवश्यक आहे त्याचं बरोबर हा तालुक्यातील विविध गावात टी पोहचावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. संतोष मोरे साहेब यांनी आपल्या मनोगतात रणपिसे क्लासेस मधला माहोल हाच अभ्यास आहे असं सांगितले. गणित हा विषय माझ्या शालेय जीवनात अवघड होता परंतु आज या क्लासेस मध्ये तो एक खेळाचा भाग आहे या बद्दल आश्चर्य वाटते आहे. तसेचं अगीवले सरांनी सुद्धा क्लासेस मधील विविध कार्यकम रणपिसे क्लासेस मॅथ्स प्रिमियर लीग यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोच पण व्यक्तिमत्त्व विकास, सभाधीटपणा, हजरजवाबी पणा अशा विविध महत्वपूर्ण गोष्टी या क्लासेस च्या माध्यमातून मिळतात असे मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार व्यक्त करुन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages