शंकरराव मोहिते महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळ व १९९३-९४ बॅचमधील महाविद्यालयाचे रसायन शास्त्र,भैतिक शास्त्र,जीव शास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विज्ञान शाखेचे सर्व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांच्या अध्यक्षतेखाली सोबतच १९९३-९४ बॅचसाठी असणारे विषयांचे प्राध्यापक प्रा.डी.एन.कुतवळ,प्रा.बी.आर.कर्चे प्रा.एस.यु.शिंदे,माजी विद्यार्थी मंडळ समन्वय प्रा.आर.एस.सावळजकर,प्रा.आर.ए.कुंभार तसेच विद्यमान प्रा.एस.एल.देवकर महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक युवराज मालुसरे माजी विद्यार्थी मंडळाचे सदस्य सौ.पद्मावती रहाटे व अरुण गुजर,पत्रकार संजय लोहकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरवात शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सर्व उपस्थितांचे स्वागत सौ.राजश्री निंबाळकर यांनी केले या प्रसंगी १९९३-९४ बॅचच्या विद्यार्थिनी व महाविद्यालयाच्या विद्यमान प्राध्यापिका सौ.सविता सातपुते यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून सर्व प्राध्यापक व महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य यांचा फेटे बांधून यथोचित सत्कार करण्यात आला.
तब्बल २८वर्षांनंतर एकत्र आलेल्या सर्वांनी आपली ओळख करून देताना महाविद्यालयाचे आपल्या यशामध्ये असलेले योगदान स्पष्ट अधोरेखित करत संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी तत्कालीन संस्थाध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील तसेच सर्व प्राध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक कर्मचारी यांचे आभार मानले.तसेच विद्यमान संस्था अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यकाळात महाविद्यालय परिसरात सुसज्ज ग्रंथालय,तसेच नूतन शैक्षणिक इमारती पाहून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या स्नेहमेळाव्यास सर्वश्री जाकिर पठाण,मधुकर लोहकरे,रविराज लव्हाळे, अनिल ढोपे,एकनाथ कदम,नंदकुमार तिकोटे,अण्णा गोरे,सुरेश शिंदे,मनोज सुरवसे,विठ्ठल माने,प्रवीण कुंभार,प्रशांत कुलकर्णी,जितेंद्र गायकवाड,मारुती जाधव,शिरीष जमदाडे,नाना घळके,हनुमंत शिवरकर,ज्ञानेश्वर नरुटे,संदीप गदादे,किशोर शिंदे,जाफर मुलानी,नागनाथ पवार ,राजेंद्र कुटे,लालासाहेब निकम,नितीन कुलकर्णी,सुनील देशमुख,सौ.राजश्री निंबाळकर,सौ.सविता सातपुते,सौ.वंदना जाधव,सौ.वंदना मोरे,सौ.परवीन चिकाळे असे १९९३-९४ च्या बॅचचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment