वरवडे सोसायटीवर शेकापचे एकहाती वर्चस्व, भाजपा व राष्ट्रवादीच्या गटाचा शेकापने केला सुफडा साफ


माढा (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील वरवडे सोसायटीवर शेकाप पक्षाचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. स्व.माजी आ.भाई एस.एम.पाटील सहकार विकास पॅनलने अॅड.बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत १३ पैकी १३ जागा काबिज करीत विजयी गुलाल उधळला.
वरवडे गावच्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुक १३ जागांसाठी पार पडली.यात ३ जागा बिनविरोध झाल्या त्या शेकाप गटाच्या संचालकांनाच मिळाल्या.उर्वरित १० जागेसाठी लागलेल्या निवडणुकीत ३१३ मतदारा पैकी ३०९ मतदारांनी मतदान केले.शेकाप च्या पाटील गटाचे १० पैकी १० संचालक जवळपास १०० मतांच्या फरकाने निवडुण आले असुन निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.या निवडणुकीत शेकाप च्या पॅनलला भाजपा व राष्ट्रवादी गटाने आव्हान दिले होते.मात्र दोन्ही पक्षाचा शेकापने सुफडा साफ केला.निकाल जाहीर होताच विजयी संचालकांनी अॅड.बाळासाहेब पाटील यांच्या समवेत स्व.माजी आ.भाई.एस.पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन विजयी जल्लोष साजरा केला.यावेळी अॅड.बाळासाहेब पाटील,अजित पाटील,भालचंद्र पाटील,सुसेन गायकवाड,संतोष गायकवाड,भारत गायकवाड,विष्णु गायकवाड,गणेश गायकवाड,अमोल पाटील,धनाजी पाटील,बापू जगताप यांचेसह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
१३ विजयी संचालक-
रमेश कसबे, बाळू रेपाळ,संतोष गुरव, अर्जुन गायकवाड, आण्णा गवळी, भारत गायकवाड, विष्णु गायकवाड, शिवाजी गायकवाड, सिध्देश्वर गुजरे, बापू थोरे, सुरेश पाटील, जयश्री गायकवाड, जयश्री मेनकुदळे
No comments:
Post a Comment