डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 31, 2022

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी!

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी

           कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस पक्षास पुन्हा गतवैभव मिळवण्या करिता डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना बळ देणे गरजेचे असून आगामी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षातर्फे विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी कुर्डूवाडी शहर काँग्रेस कडून करण्यात आली आहे.

           सोलापूर जिल्हा सुरुवाती पासूनच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे.सोलापूर जिल्ह्यातील जनतेने कायम काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल देऊन पक्षाच्या ध्येयधोरणास कायम पाठींबा दिलेला आहे. परंतु सध्याच्या प्रतिकूल काळात काँग्रेस पक्षामध्ये थोडीशी मरगळ आलेली आहे.

           सध्यस्थिती मध्ये काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची जबाबदारी डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवक पुन्हा काँग्रेसकडे आकर्षित होत आहे. काँग्रेस पक्षास पुन्हा गतवैभव मिळवण्या करिता डॉ.मोहिते-पाटील यांना बळ देणे गरजेचे आहे. त्याकरिता आगामी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पक्षातर्फे विधान परिषदेवर संधी द्यावी. 

           यामुळे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळण्यास मदत होईल,अशी जिल्ह्यातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना असल्याचे अध्यक्ष फिरोज खान यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages