छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अजिंक्यराणा पाटील व जालिंदर भाऊ लांडे हस्ते, करून मिरवणुक संपन्न

कुरुल (कटूसत्य वृत्त):- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुरूल नगरीमध्ये रौद्रशंभु प्रतिष्ठान यांच्या वतीने दि.14 /05 /2022 रोजी संभाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. या तीन दिवस जयंती उत्सवामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,दि.17 रोजी सायंकाळी युवकांचा बुलंद आवाज अजिंक्यराणा पाटील ,पंचायत समिती सदस्य जालिंदर भाऊ लांडे ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष छत्रपती जाधव, ग्रामपंचायत सदस्य सिताराम लांडे ,गहिनीनाथ जाधव, सुरेश बापू जाधव,प्रा.माऊली जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी, प्रदीप जाधव, रामभाऊ लांडे,भरत क्षिरसागर, राजवीर क्षिरसागर, अमोल जाधव, , प्रमोद जाधव, प्रतापसिंह पाटील, कुरुल ग्रामस्थ व युवक वर्ग व रौद्रशंभू प्रतिष्ठान पदाधिकारी आदी उपस्थित होते.
0 Comments