सेवानिवृत्ती बद्दल राजाराम टोणपे यांचा सत्कार...

बेंबळे (कटुसत्य वृत्त): येथील श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील सहशिक्षक राजाराम लक्ष्मण टोणपे हे आपल्या 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले, याबद्दल माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत , माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे तसेच संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद भोसले सर आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.,तसेच प्रथम त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. राजाराम टोणपे हे शिराळ-( माढा) चे रहिवासी असून1991 साली विमलेश्वर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 91 ते 93 पर्यंत यांनी मोफत सेवा केली व आता 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत .मराठी आणि संस्कृती विषयाचे उत्कृष्ट अभ्यासू व मनमिळावू शिक्षक म्हणून टोणपे सर विद्यार्थी वर्गात आदरणीय होते. त्यांनी सेवेत असताना शासनाचे व संस्थेचे अनेक उपक्रम मोठ्या हिररीने राबवले. त्यांचे मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झालेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, पोलीस अधिकारी व लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी म्हणून सध्या कार्यरत आहेत. सत्काराला उत्तर देताना सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून टोणपे म्हणाले की 31 वर्षे सर्व सहकारी व विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये अतिशय चांगली सेवा पार पडली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सुसंस्कृत व सुसंस्कारित बनावे, निर्व्यसनी राहावे, आई-वडिलांचा आदर करावा, अपयशाने खचून जाऊ नये, सकारात्मक विचारसरणी ठेवावी व उदात्त ध्येय समोर ठेवून अखंड प्रयत्न करीत राहावे.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक अशोक बागवाले, दत्तात्रय ननवरे कृषी उत्पन्न चे संचालक दिलीपराव भोसले बापूराव पवार संचालक नागेश मस्के माऊली पवार कुर्डूवाडी चे नगरसेवक आनंद टोणपे तसेच ठिकठीकाणचे मुख्याध्यापक सर्वश्री गायकवाड कदम कोकाटे नंदू टोणपे अरुण टोणपे यांचेसह अनेक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते
0 Comments