Hot Posts

6/recent/ticker-posts

इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या

इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या

            मुंबई (नासिकेत पानसरे): इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात यावी यादृष्टीनं राज्य शासनाने पाऊले टाकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने प्राथमिक उद्घोषणा करून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

            कोल्हापूर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून नागरी क्षेत्र आणि लोकसंख्याही वाढली आहे.  सध्या केवळ कोल्हापूर महानगरपालिका असून खासदार धैर्यशील माने आणि इतर लोकप्रतिनिधींची इचलकरंजी महानगरपालिका करण्यासंदर्भात  मागणी   होती.

Reactions

Post a Comment

0 Comments