"विदर्भातील एक योगी"... पुस्तकाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते प्रकाशन..!
बेंबळे : (कटुसत्य वृत्त)बेंबळे येथील प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ संजूदेव जोशी यांचे ज्येष्ठ बंधू व ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर जोशी यांनी शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरित्रावर आधारित लिहिलेल्या" विदर्भातील एक योगी" या पुस्तकाचे प्रकाशन आमदार बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले. वृत्तांत असा की बेंबळे येथील जोशी घराणे हे संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असून त्यांनी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची काही वर्षांपूर्वी लहानशा मंदिरात स्थापना केली आहे. परंतु या मंदिराचे विस्तारीकरण व आकर्षक सभामंडपासहित सुशोभीकरण करण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी आमदार फंडातून 13 लाख रुपये दिले आहेत. या सर्व बाबींचे स्मरण व उतराई म्हणून मनोहर जोशी लिखित ' विदर्भातील एक योगी' पुस्तकाचे प्रकाशन आमदार बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले. या पुस्तकाला अकलूज ते प्राध्यापक डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांची प्रस्तावना आहे. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले ज्योतिष तज्ञ संजूदेव जोशी, अशोक मराठे, दादा भगत मालक ,माजी सरपंच कैलास भोसले, नागेश मस्के, सोसायटीचे सदस्य माऊली पवार, मुकुंद रामदासी, धनंजय मोरे,दादा भोसले,अविनाश भोसले, रावसाहेब मिसाळ ,अनिल सलगर आदी मान्यवर उपस्थित होते .आमदार बबनदादा शिंदे यांनी लेखक मनोहर जोशी यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
0 Comments