Hot Posts

6/recent/ticker-posts

सुरेश हसापुरेंनी दक्षिणच्या सोसायट्या अडून काँग्रेस केली मजबूत

सुरेश हसापुरेंनी दक्षिणच्या सोसायट्या अडून काँग्रेस केली मजबूत

              दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून दक्षिण सोलापूर ओळखला जातो मात्र मागील काही वर्षात काँग्रेस नेते वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेल्याने पक्षाची चांगलीच पडझड झाली.

              दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरेश हसापुरे हेच काँग्रेसचे नेतृत्व करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये सुरेश हसापुरे यांनी पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे.

              तालुक्यातील 82 सोसायटयांपैकी तब्बल 54 सोसायट्या ताब्यात घेतल्या आहेत. आणखी 6 सोसायटयांवर वर्चस्व राहील असा दावा हसापुरे यांनी केलाय.

              काँग्रेस पक्षात असताना दिलीप माने हे तालुक्याचे नेतृत्व करत होते मात्र ते शिवसेनेत गेले आता राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत परंतु त्यांचा फोकस पुन्हा दक्षिण तालुक्यावर असल्याने ते संभ्रमावस्थेत आहेत.

              दक्षिण तालुक्यातून त्यांना काँग्रेस कडून पसंती दिली जातं आहे. दिलीप माने नसल्याने तालुक्याचे नेतृत्व सुरेश हसापुरे यांच्याकडे आले आहे. मागील अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलेली शेतकऱ्यांची कामे, त्यांना मिळवून दिलेले कर्ज तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणलेला निधी, केलेली विकास कामे याच्या जोरावर हसापुरे यांना तालुक्यातून पसंती दिली जाते.

              जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय कुठेही नागरिकांचे कामे असतील तर हसापुरे स्वतः त्या कार्यालयात जाऊन कामे करून घेतात त्यामुळे जनमानसात त्यांची चांगली प्रतिमा दिसून येते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून हसापुरे मानले जातात.

              प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा ही त्यांनी विश्वास संपादन केला आहे. हसापुरे म्हणाले, मी संचालक असताना कोट्यावधी रुपयाचा कर्ज वाटलो सर्व सामान्य शेतकरीवर्गाना दोन वेळा कर्ज माफी झाली. स्वत:च्या हितासाठी बँकेचे वापर केला नाही. म्हणून सर्व संचालकाना माझ्या वाढदिवसानिमित्त 29 मे रोजी सकाळी दहा वाजता टॉवेल टोपी व महिलां सदस्यांना साडी चोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments