चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शासनाने सर्वच सरकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली असून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासह विविध मागण्यासाठी राज्यस्तरीय चतुर्थश्रेणी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक 17 मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा कडून शासनाचा तीव्र निषेध केला. या मोचाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथीलडॉ.आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचायांच्या हाती विविध मागण्याचे फलक होते तसेच यावेळी विविध घोषणा देण्यात येतहोत्या. मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, मागण्या आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, इस शासन पर हल्ला बोल, जोर से बोल हल्लाबोल, असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेटसमोर मोचाची समारोप झाला. मोर्चाचे रुपांतर ठिय्या आंदोलनात झाले. याठिकाणी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष देविदास शिंदे,जिल्हाध्यक्ष शंतनु गायकवाड, कामगार कृती समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी आंदोलनाची अधिक माहिती दिली...
या आंदोलनात उमाकांत लोंढे ,सिविल हॉस्पिटलचे शंकर जाधव, नितीन कसबे, पंकज जाधव, विमा रुग्णालयाचे महेश बनसोडे,रवी टावळी, महसूल संघटनेचे प्रशांत भांडेकर, अनिल पवार, उमेश कदम, चेतन खरात ,बिटादर आनंद सोनकांबळे, विश्वास सुतार, नारायण कुलकर्णी, बाळासाहेब जाधव, आयटीआय विभागाचे प्रभाकर मंडळ, प्रकाश जाधव, सहकार खात्यातील रमेश केंद्रे ,वाहन चालक संघटनेचे बंदिश वाघमारे, वंदना गुंड यांच्यास विविध कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments