आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून स्थानिक विकास योजनेतून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आर्थिक सहाय्य

सोलापूर, (कटुसत्य वृत्त): आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून सोलापुरातील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रगती श्रीरंग सोलनकर (लॉन टेनिस) आणि प्रज्ञेश समित यादवाड (स्केटींग) या दोन खेळाडूंना प्रत्येकी 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आले.
आमदार श्रीमती शिंदे यांनी दोन्ही खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करावे व सोलापूरचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक विकास निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दोन संगणक देण्यात आले. आर्थिक मदतीबद्दल खेळाडूंच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, कार्यासन अधिकारी सत्येन जाधव, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, भैरवनाथ नाईकवाडी, वरिष्ठ लिपीक शैलेंद्र माने, स्वीय सहाय्यक मोहम्मद काझी, स्केटींग संघटनेचे दीपक घंटे यांच्यासह पालक उपस्थित होते.
0 Comments