Hot Posts

6/recent/ticker-posts

अभिनेत्री केतकी चितळेला अॅक्टोसिटी गुन्ह्याखाली पोलिस कोठडी

अभिनेत्री केतकी चितळेला अॅक्टोसिटी गुन्ह्याखाली पोलिस कोठडी 

            मुंबई, (नासिकेट पानसरे):- बौद्ध धर्मा विषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील नवीमुंबई रबाळे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्या नंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.केतकी चितळेच्या अडचणीत आता वाढ झालेली असून तिच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

            राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केतकीने समाज माध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. नुकतीच तिला न्यायालयाने या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. केतकी विरोधात यापूर्वी रबाळे पोलीस ठाण्यात बौद्ध धर्माविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामुळे रबा‌ळे पोलिसांनी आता तिचा ताबा घेतला आहे.आज शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलिस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले. तर या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी केतकी चितळेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments