पंढरपूर शहरातील नालेसफाई करण्यात आलेली नाही ; खुली गटारे तीन ते चार फूट गाळाने भरलेली
.png)
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- यंदाचा पावसाळा तोंडावर आला आहे. तरीही शहरातील नालेसफाई करण्यात आलेली नाही. शहरातील खुली गटारे तीन ते चार फूट गाळाने भरलेली आहेत. तर भूमिगत गटारीही गाळाने भरलेली आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नागरिकांच्या घरात आणि व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यंदाच्या पावसाळ्याने दारावर धडका देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने शहरातील नालेसफाई वेळेतच करण्याची अपेक्षा होती. मात्र, अद्याप शहरामध्ये एकाही नाल्यातील गाळ काढण्यात आलेला नाही.शहरातील भूमिगत गटार योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे. अनेक ठिकाणच्या चेंबर्सचे झाकण फूटलेले आहेत. गटारी गाळाने भरल्यामुळे पावसाळ्यात ती तुंबतात. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी येते. शहराच्या सखल भागात दरवर्षी पाणी भरल्यामुळे नागरिकांना रात्र-रात्र जागून काढावी लागलेली आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान होते. नागरिक आणि व्यापाऱ्यांना दरवर्षी असा अनुभव येऊनही पालिका प्रशासन नालेसफाई करण्याविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही. दरवर्षी नाले सफाईवर लाखो रुपये खर्च होतो. मात्र, गटारींतील गाळ काढला जात नाही.शहरातील भूमिगत गटार योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आहे. अनेक ठिकाणच्या चेंबर्सचे झाकण फूटलेले आहेत. गटारी गाळाने भरल्यामुळे पावसाळ्यात ती तुंबतात. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी येते. शहराच्या सखल भागात दरवर्षी पाणी भरल्यामुळे नागरिकांना रात्र-रात्र जागून काढावी लागलेली आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानातही पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान होते. नागरिक आणि व्यापाऱ्यांना दरवर्षी असा अनुभव येऊनही पालिका प्रशासन नालेसफाई करण्याविषयी गंभीर असल्याचे दिसत नाही. दरवर्षी नाले सफाईवर लाखो रुपये खर्च होतो. मात्र, गटारींतील गाळ काढला जात नाही.नेहमीप्रमाणेच या वर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने नालेसफाई केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment