एसटी स्थानकात गाड्या लावण्याची शिस्तच नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 24, 2022

एसटी स्थानकात गाड्या लावण्याची शिस्तच नाही

एसटी स्थानकात गाड्या लावण्याची शिस्तच नाही

                 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एसटी स्थानकात गाड्या लावण्याची शिस्त नाही. स्थानकात फलाटावर एसटी गाड्या अस्ताव्यस्त लागत आहेत. त्यामुळे गाड्यांना जागा कमी पडत आहे. परिणामी स्थानकाबाहेरील रस्त्यावर गाड्यांची रांग लागत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत आहे.आधी कोरोना लॉकडाऊन आणि नंतर कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपामुळे एसटी गाड्या बंद होत्या. संपावरील कर्मचारी परतल्यानंतर एसटी गाड्यांची सेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र, शिस्त काही परतली नाही.  पुढील गाडी हलल्याशिवाय मागील गाड्यासाठी जागा होत नाही. आगार नियंत्रकाचे लक्ष नसल्याने गाड्या बेशिस्तपणे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा प्रवाशांनाही फटका बसत आहे. गाड्या फलाटावर लावण्याऐवजी मधेच मोकळ्या जागेत उभ्या केल्या जातात. त्यामुळे गाड्यांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा राहात नाही.कुठेही बस उभी करून प्रवासी उतरवले जातात.त्यामुळे रस्त्यावर बाहेरुन येणाऱ्या एसटी बसची रांग लागते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages