टॉय ट्रेनसाठी महिन्याला ९० हजार ७८६ रुपये देण्याची तयारी
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर परिसरातील टॉय ट्रेनसाठी महिन्याला ९० हजार ७८६ रुपये देण्याची तयारी एका मक्तेदाराने दाखविली.या मक्तेदाराला दोन दिवसांत वर्कऑर्डर देणार असल्याचे सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांनी सोमवारी सांगितले.महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर मंदिर, भुईकोट किल्ला परिसराचे सुशोभीकरण केले आहे.किल्ल्याच्या बाजूने टॉयट्रेनची सफर करता येणार आहे. ही टॉय ट्रेन चालविण्यासाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबविली.पाच मक्तेदारांनी निविदा भरली.पालिकेने या कामासाठी महिन्याला ६६ हजार रुपये भाडे,अशी आधारभूत किंमत ठरविली होती.एका मक्तेदाराने महिन्याला ९० हजार ७८६ रुपये देण्याची तयारी दाखविली.या मक्तेदाराला वर्कऑर्डर देणार आहेत.
No comments:
Post a Comment