सोलापुरात येणारी ९०० लिटर हातभट्टी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोलापुरात येणारी ९०० लिटर हातभट्टी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, ही कारवाई सोमवारी दुपारी केली.
हरी बाळकृष्ण शिंदे (३३, रा.उळे, ता. उत्तर सोलापूर), राजा भगवान जमदाडे (५०, रा. खांडेकर वस्ती, बक्षी हिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सोलापुरात हातभट्टी दारू येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे सर्व्हिस रोडवर सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार जीप (क्र. एमएच ४२ एच १४२३) येताना दिसली.पथकाने थांबण्याचा थांबण्याचा इशारा करून जीप बाजूला घेण्यास सांगितले.तपासणी केली असता आतमध्ये १० रबरी ट्यूबमध्ये ९०० लिटर हातभट्टी दारू आढळून आली.पथकाने हातभट्टी दारू व जीपसह चार लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक एस. एम. मस्के, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. आर. होळकर, जवान के. एस. लुंगसे, ए. एन. पांढरे, पी.एस. सावंत, जी. के. ढब्बे यांनी पार पाडली.
No comments:
Post a Comment