Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय असल्याचा अभिमान बाळगा! राष्ट्रसेवा दलाचे सद्भावना आंदोलन

भारतीय असल्याचा अभिमान बाळगा! राष्ट्रसेवा दलाचे सद्भावना आंदोलन

           कल्याण (नासिकेत पानसरे)महाराष्ट्र दिनी कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कलावंत, कवी, लेखक या भारतीय नागरिकांनी शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रेमाचं, शांततेचं प्रतिक असलेल्या सफेद रंगाचे वेष परिधान करुन, सफेद वस्त्र हाती धरुन सद्या देशात धर्माच्या नावाने जनतेमध्ये द्वेष व तेड निर्माण करुन फूटीचे आणि भयावह वातावरण तयार केले जात आहे. त्याचा निषेध व्यक्त करुन, देशातील प्रश्न, समस्या  महामानव गौतम बुध्द व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने, प्रेमाने, शांततेने संवादाच्या माध्यमातून सोडविले जाऊ शकतात, असा ठाम विश्वास व्यक्त करुन हा संदेश दिलेला आहे. ह्या एक तासाच्या शांततापूर्वक आंदोलनातून आम्ही हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

           या आंदोलनात जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर, बाबा रामटेके, नरेंद्र डुंबरे, किरण सोनावणे, प्रसिध्द सिने चित्रपट कलावंत अभिजित झुंजारराव, प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ. सुहास चौधरी, राष्ट्र सेवा दलाचे सुहास कोते, अनुपकुमार पाण्डेय, मिलिंद गायकवाड, विशाल जाधव, बाळा शिंदे, संतोष कटके, नरेश चव्हाण, अनुबंध चे सुर्यकांत कोळी, राहुल उकांडे, अं नि स चे उत्तम जोगदंड, युसुफ मेहेरअल्ली सेंटरच्या गुड्डी, भारतीय महिला फेडरेशनच्या संकल्पना कर्हाडे, पुरोगामी विचार मंच चे बंडू घोडे, सामाजिक कार्यकर्ते शैलेष सोनार व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व भारतीय नागरिक सामिल झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments