कामगार, महाराष्ट्र दिनानिमित्त लेबर पार्टीतर्फे ध्वजारोहण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-०१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त १४४ सिध्देश्वर पेठ येथे लेबर पार्टी महाराष्ट्रच्या मुख्यालयात ज्येष्ठ कामगार नेते, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष कॉ.रविंद्र मोकशी यांच्या हस्ते शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले.यावेळेस ज्येष्ठ कामगार नेते अॅड. रा.गो.म्हेत्रस, लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद, जिल्हाध्यक्षा सत्यव्वा गायकवाड, कॉ. एजाज शेख, चंद्रकांत हंचाटे, समता मजदूर युनियनचे अध्यक्ष छगन पंढरे, महाराष्ट्र लेबर युनियनचे सचिव अशपाक शेख,ललिता बाघमारे,अरविंद जंगम,जे.एम.शिकलगर, कविता शिवशरण,बाबा बागवान,उल्फा सरवदे,कलावती वाघमारे,अख्तर शेख,जहिर शेख,जैद शेख उपस्थित होते.
0 Comments