Hot Posts

6/recent/ticker-posts

दर महिना दोन लाख रुपयांची वीज बचत

दर महिना दोन लाख रुपयांची वीज बचत

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वीज वापरात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सोलापुरात दोनच ऋतू असतात. एक तर उन्हाळा किंवा तीव्र उन्हाळा, असे म्हटले जाते. याच उक्तीचा व्यवहारिक उपयोग करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात १०० केव्हीए व १५० केव्हीए असे दोन सोलार प्रकल्प कार्यान्वित करून दर महिना दोन लाख रुपयांची वीज बचत करण्यात यश मिळविले आहे.कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सोलार एनर्जीमुळे विद्यापीठाची वीज बिलात मोठी बचत तर होत आहेच, शिवाय ऊर्जा निर्मिती मुळे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे. पहिली १०० केव्हीएची योजना विद्यापीठाने सहा वर्षापासून कार्यान्वित केली आहे. तर २०२१ पासून १५० केव्हीए सोलार एनर्जीची योजना स्मार्ट सिटी अंतर्गत कार्यान्वित झाली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments