Hot Posts

6/recent/ticker-posts

आईने स्केटिंगवर असलेल्या मुलाचे बोट धरून हुतात्मा चार पुतळा चौकापर्यंत मार्गक्रमण केले

आईने स्केटिंगवर असलेल्या मुलाचे बोट धरून हुतात्मा चार पुतळा चौकापर्यंत मार्गक्रमण केले

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक मातृदिनानिमित्त चेतक रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची रॅली काढण्यात आली.या कार्यक्रमाचे संयोजन सद्भावना दलाचे दिव्यकांत गांधी यांनी केले. या रॅलीमध्ये क्लबचे ४ ते १६ वयोगटातील स्केटर्स मुले व मुली व त्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. या रॅलीचा प्रारंभ तिरंगा बंगला येथे भारतमातेला वंदन करून करण्यात आला. आईने स्केटिंगवर असलेल्या मुलाचे बोट धरून हुतात्मा चार पुतळा चौकापर्यंत मार्गक्रमण केले. स्केटिंग करणाऱ्या आपल्या लाडक्या मुलांसोबत चालताना आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.मुलांनी ‘आई तुला नमस्कार, आई तुझ्या मातृत्व भावनांना नमस्कार, आई तुझ्या कर्तव्यनिष्ठेला नमस्कार’ अशा घोषणा देत स्केटिंग केले. हुतात्मा चार पुतळा येथे मुलांनी आईला गोड पदार्थ चारले. तदनंतर आईने मुलांना कवटाळून गोड पदार्थ चारले. मुलांनी आईला लाल गुलाबाचे फूल देऊन, आपले निखळ मातृप्रेम व्यक्त केले. कुटुंबाची विनाखंड सेवा करणाऱ्या मातांच्या भावनांची कदर व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments