‘लोकमंगल’तर्फे आदर्श कर्जदारांचा सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकमंगल समूहाच्या रौप्य महोत्सवानिमित्त विजापूर रस्त्यावरील लोकमंगल नागरी पतसंस्थेतर्फे मंगळवारी आदर्श कर्जदारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी बँकेचे सल्लागार बनसिद्ध गुरव, मल्लिकार्जुन किणगी, महादेव उटगे, शाखाधिकारी मीनाक्षी पाटील यांच्यासह पतसंस्थेचे शाखाधिकारी आदी उपस्थित होते. संगीता व्हनमराठे, विद्या स्वामी, नितीन बेंद्रे, शिवलिंगप्पा मेडेगार, धानम्मा सपकाळ या कर्जदारांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments