Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या प्रांगणात अकरा जोडप्यांच्या बांधण्यात आल्या रेशीमगाठी...

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या प्रांगणात अकरा जोडप्यांच्या बांधण्यात आल्या रेशीमगाठी...

               टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व निमगाव टे. येथील विठ्ठलराव शिंदे बहुद्देशीय संस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात संपन्न झालेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अकरा जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रंणजीत भैया शिंदे माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण अमोल भारती पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर कारखान्याचे उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव कृषी उत्पन्नाचे उपसभापती सुहास पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशिगंधा माळी कृषी उत्पन्न चे संचालक दिलीप राव भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकसेवा व राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होणाऱ्या 26 उमेदवार व्यक्तींचा आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे  यांच्या हस्ते फेटा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

               याप्रसंगी आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की कोरोनामुळे बंद झालेला मोफत विवाह सोहळ्याचा सामाजिक उपक्रम आम्ही पुन्हा सुरू केला आहे. लोकसेवा व राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्कारातून पुढील  पिढीस प्रेरणा व उत्तेजन मिळावे हाच उद्देश असून नवविवाहीत जोडप्यांना आमदार शिंदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी रंणजीत  भैया शिंदे म्हणाले की आ.बबन दादांच्या प्रेरणेने विवाह सोहळा, काशीयात्रा नेत्र शिबीर हे सामाजिक  उपक्रम कोरोना नंतर आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. यावर्षी अतिशय घाईत या सोहळ्याचे नियोजन करण्यात आल्यामुळे वधू-वर यांची संख्या कमी आहे परंतु पुढील वर्षी मात्र अगोदर सहा महिन्यापासून सर्वत्र जाहिराती व विवाह नोंदणी व्यवस्था करण्यात  येईल. लोकसेवा व राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यामध्ये माढा व करमाळा तालुका अग्रेसर आहे. यापुढे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर या मान्यवरांच्या सत्काराचे नियोजन  करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना यांच्यापासून प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल व त्यांच्यात  जिद्द निर्माण होईल. हे सर्व भावी अधिकारी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळे मधून आलेले आहेत तेव्हा त्यांनी भावी आयुष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असेही रणजित शिंदे यांनी आवर्जून सांगितले .या कार्यक्रमात अमोल भारती निलेश कदम मेघाताई उकीरडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

               विवाह सोहळ्यापूर्वी वधु वारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रथम बौद्धधर्मीय व नंतर हिंदूधर्मीय पद्धतीने विवाह संपन्न झाले .यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची दिवसभर भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

               या सोहळ्यास कारखान्याचे संचालक लक्ष्मण खूपसे आप्पा उबाळे बंडूनाना ढवळे सुभाष नागटिळक पांडुरंग घाडगे नागनाथ पाटील प्रभाकर कुटे रमेश येवले पाटील संभाजी पाटील कांतीलाल नवले रामभाऊ शिंदे रमेश पाटील आदी मान्यवरांच्या सहित तीन ते चार हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक शिवाजी डोके यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments