Hot Posts

6/recent/ticker-posts

सिव्हिलमध्ये परिचारिकाही एक दिवस काम बंद आंदोलन

 सिव्हिलमध्ये परिचारिकाही एक दिवस काम बंद आंदोलन

              सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २३, २४ व २५ राेजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २३ ते २५ मे पासून मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक तास काम बंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानुसार सिव्हिलमध्ये परिचारिकाही एक दिवस काम बंद आंदोलन, निदर्शने करतील. मागण्या मान्य न झाल्यास २६ व २७ मे रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन तर दि २८ मे पासून काम बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या मनीषा शिंदे, भीमराव चक्रे यांनी दिली. हे आंदोलन राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी वारंवार सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे. आझाद मैदानातही निदर्शने करण्यात येणार आहेत.२५ मे पर्यंत शांततेत आंदोलन व निदर्शन परिचारिका कडून करण्यात येणार आहेत . जर याची दखल घेतली गेली नाही तर पुढे दिनांक २६ आणि २७ मे 2022 रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान सरकारने चर्चा करण्याची तयारी न दर्शवल्यास २८ मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.आजपासून सुरू झालेल्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी झाल्या आहेत. रुग्णसेवेवर याचा संभाव्य गंभीर परिणाम होऊ शकतो.तसे झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन व शासन जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

परिचारिकांच्या मुख्य मागण्या?

  • वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांची पदे कंत्राटीकरण न करता, कायमस्वरुपी पदभरती करण्यात यावी.
  •  राज्यातील विद्यार्थी परिचारिकांच्या विद्यावेतनात वाढ करावी.
  •  केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे, गणवेश भत्त्यात वाढ करण्यात यावी.
  •  केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे नर्सिंग भत्ता लागू करण्यात यावा. सरसकट नियमितपणे 7200 रुपये

प्रतिमहिना भत्ता नव्याने मंजूर करावा. इतर भत्ते सुविधा केंद्र सरकार प्रमाणे लागू करण्यात यावे.

परिचारिकांच्या मुख्य मागण्या?

  • राज्यातील विद्यार्थी परिचारिकांच्या विद्यावेतनात वाढ करावी.

Reactions

Post a Comment

0 Comments