महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे चठ्ठीद्वारे काढणार
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या ३८ प्रभागांत ११३ जागांच्या निवडणुकीसाठी ओबीसीविना आरक्षण सोडत ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे चिठ्ठीद्वारे काढण्यात येणार आहे. यात ५७ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. ३८ प्रभागांपैकी २१ प्रभागांत दोन महिला असतील. १६ प्रभागांत दोन खुल्या जागा असतील. प्रभाग क्रमांक ३८ मध्ये दोन जागा असल्याने तेथे एक महिला तर एक जागा खुली असणार आहे. यात अनुसूचित जातीसाठी १६ तर अनुसूचित जमातीसाठी २ जागा असणार आहेत. अनुसूचित जाती व जमातीसाठी ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे. कोणत्या जागा महिलांसाठी आरक्षित होतील? हे ३१ मे रोजी नक्की होणार आहे.
0 Comments