Hot Posts

6/recent/ticker-posts

अर्धनारी येथिल विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडनूक चुरशीची व रंगतदार होनार

 अर्धनारी येथिल विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडनूक चुरशीची व रंगतदार होनार


घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- मौजे अर्धनारी येथिल बाबूराव आण्णा पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची आज तागायत नेहमी बिनविरोध होनारी निवडणुक यावर्षी चुरशीची व रंगतदार होनार आहे, ही निवडनूक म्हणजे आगामी ग्रामपंचायत निवडनूकिची  रंगीत तालीम असल्याचे बोलले जात आहे. अर्धनारी हे भीमा नदीच्या काठावार वाळ् साठी प्रसिद्ध असलेले गाव आहे, संपूर्ण गांव बागायत असुन वाळूने "अर्थपूर्ण"झालेले गांव आहे.मोहोळ तालुक्यात राजन पाटील व मनोहर डोंगरे गट एकत्र असताना सोसायटीवर स्थापनेपासुन आज तागायत गावातील प्रताप पवार यांचे वर्चस्व आहे,परंतु मध्यंतरी राजन पाटील व मनोहर डोंगरे गटात फूट पडल्याने दोन गटात निवडनुक लागली आहे. डोंगरे गटातुन प्रताप पवार विरुद्ध राजन पाटील गटातुन सुभाष पवार अशी लढत होनार आहे.सुभाष पवार यांचा मुलगा पांडूरंग पवार यांनी "अभी नहीं तो कभी नहीं" आता माघार नाहीच अशी भूमिका घेतली आहे, तर प्रताप पवार ही पूर्ण "ताकदीनिशी" उतरनार असल्याचे बोलले जात आहे.यात जाधव ग्रुपचे सचिन जाधव , अन्नासाहेब जाधव व गावचे सामाजिक नेते मंडळीनीची, युवा कार्यकर्त्यांची भूमिका ही महत्वाची असनार आहे.भीमा व लोकशक्ति परिवार (प्रताप पवार) गटातून उमेदवार पुढ़िल प्रमाणे आहेत.  धोंडिबा जाधव,महादेव पवार, नागनाथ माने, दशरथ कांबळे, महालिंग चव्हान,संजय भोपळे,कांतिलाल भांगे, रावा बेरड,विमल पवार, रतन बेरड, जनार्धन कोळी,दिलीप चंदनशीवे इत्यादि उमेदवार आहेत,तर सिद्धेश्वर परिवर्तन विकास आघाड़ीतून (सुभाष पवार) यांच्या गटातून सिद्धेश्वर पवार, सुरेश पवार,सुनिल पावर,गणेश पवार,विशाल शिनगारे,रावसाहेब कांबळे,धोंडीबा बेरड,नागेश साळवे,कावेरी मूळे,सुमन शिवशरण,अशोक कोरूलकर, आण्णा शिवशरण इत्यादि उमेदवार आहेत, तर महादेव बुरांडे हे प्रताप पवार गटातून बिनविरोध झाले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments