केंद्रापासून लांब असलेल्या गावात नेमका किती पाऊस झाला, याची कुठेही नोंद नाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

केंद्रापासून लांब असलेल्या गावात नेमका किती पाऊस झाला, याची कुठेही नोंद नाही

केंद्रापासून लांब असलेल्या गावात नेमका किती पाऊस झाला, याची कुठेही नोंद नाही

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संतोष पाटील सांगतात,गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. शेतीपिके उद्ध्वस्त होतात.शेतकरी पीकविम्यासाठी अर्ज केल्यानंतर पावसाची नोंदच प्रशासनाकडे नसते.त्यामुळे आमच्या गावातील अनेकांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागते. सर्कलऐवजी गावपातळीवर पर्जन्यमापक यंत्रणा बसविल्यास प्रशासनाकडे पावसाची योग्य नोंद होईल, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.सध्या जिल्ह्यात ९१ सर्कल परिसरात ९१ पर्जन्यमापक यंत्रणा सज्ज आहेत.अॅटोमेटिक वेदर स्टेशन अर्थात  स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत.या केंद्रावर आठ ते नऊ गावांत झालेल्या पावसाची नोंद होते.यंत्रणा शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी जिल्ह्यात नव्याने झालेल्या सर्कल परिसरात आणखी पर्जन्यमापक बसविण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे.त्यामुळे केंद्रापासून लांब असलेल्या गावात नेमका किती पाऊस झाला, याची कुठेही नोंद नसते.पाऊस सर्वत्र विषम प्रमाणात पडत असल्यामुळे प्रशासनाकडे देखील याची अचूक माहिती नसते.याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागते.महसूल विभागाकडून नव्याने १९ सर्कलची निर्मिती झाली असून जिल्ह्यात सध्या ११० सर्कल कार्यरत आहेत.यापैकी फक्त ९१ सर्कलमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages