खासगी सावकारांकडून दमदाटी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

खासगी सावकारांकडून दमदाटी

खासगी सावकारांकडून दमदाटी

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूरमंद्रूपच्या एका शाळेतील निवृत्त लिपिकाने वेगवेगळ्या ठिकाणच्या चार खासगी सावकारांकडून व्याजाने ५७ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यापोटी ३८ लाख १४ हजार रुपये परत दिले, तरीही मुद्दलासह व्याजापोटी आणखी ५३ लाख ५६ हजार रुपये दे म्हणून दमदाटी करण्यात आली. धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चार खासगी सावकारांविरुद्ध मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंद्रूप, वडकबाळ व सोलापूर येथील खासगी सावकारांचा यात समावेश आहे. मीरासाहेब रमजान लिगेवान (रा. मंद्रूप), पैगंबर साहेबलाल शेख (रा. वडकबाळ), अनिल नारायण राठोड (रा. प्रतापनगर, सोलापूर), शीलरत्न हणमंत जोगळेकर (रा. मोदी, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. निवृत्त लिपिक सोमशंकर जगदेव जवळकोटे (वय ५९, रा. स्वामी समर्थ नगर, मंद्रूप)यांनी प्रापंचिक अडचणींसाठी वेळोवेळी संशयित खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. या चारही सावकारांनी त्यांच्याकडून व्याजाची वसुली केली. एका सावकाराने व्याज देण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून कर्ज काढून देण्यास सांगितले. त्यांच्याकडून पैसे घेऊनही मुद्दलासह व्याजापोटी आणखी पैशांची मागणी केली. त्यांना वारंवार फोनवरून व प्रत्यक्ष घरी येऊन दमदाटी केली. पैसे न दिल्यास घरी येऊन मारहाण करू, तुम्ही दिलेले कोरे धनादेश बँकेत जमा करून ते न वटल्याचा गुन्हा दाखल करू, असा धमक्या जवळकोटे यांना दिल्या. त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक त्रास दिला. त्यामुळे जवळकोटे यांनी खासगी सावकारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर चारही खासगी सावकारांविरुध्द मंद्रूप पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ५०६, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार करपे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages