रानमसले वितरिकेसाठी निकृष्ट दर्जाच्या पाइप वापरला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

रानमसले वितरिकेसाठी निकृष्ट दर्जाच्या पाइप वापरला

रानमसले वितरिकेसाठी निकृष्ट दर्जाच्या पाइप वापरला

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):-‘ठेकेदाराच्या कामावर विश्वास ठेवू नका, ते संधीची वाटच पाहत असतात. तुम्ही स्वतः लक्ष द्या’, अशी सूचना आमदार यशवंत माने यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या अभियंत्यांना केली. रानमसले वितरिकेसाठी निकृष्ट दर्जाच्या पाइप वापरल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शनिवारी माने यांनी या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रशासनाचे कान टोचले.

            योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत. यात आयएस मार्क नसलेले पाइप वापरल्याचे आढळून आले. याबाबत आमदारांकडे तक्रार करण्यात आली होती.माने यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बळीराम साठे होते. त्यांनी योजनेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव, शाखा अभियंता प्रमोद कल्याणकर यांना कामाचा दर्जा राखण्याबाबत सक्त सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages