महिम वि.का.स. सेवा सोसायटीत २५ वर्षानंतर सत्तांतर..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

महिम वि.का.स. सेवा सोसायटीत २५ वर्षानंतर सत्तांतर..!

महिम वि.का.स. सेवा सोसायटीत २५ वर्षानंतर सत्तांतर..!

स्व.शिवाजीराव चौगुले शेतकरी परीवर्तन आघाडीचा दणदणीत विजय ; राष्ट्रवादी भवन येथे सर्व संचालकांचा सत्कार 

             सांगोला (कटूसत्य वृत्त):- महिम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्व. शिवाजीराव नानासाहेब चौगुले शेतकरी परिवर्तन आघाडीने प्रस्थापित बलाढ्य गटाचा दारूण पराभव करत सर्वच्या सर्व म्हणजे १३ जागांवर दणदणीत विजय मिळविला. नूतन सर्व संचालकांचा आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन सांगोला येथे सोमवार दि २३ रोजी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून प्रथमच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सत्तांतर घडून आल्याने नूतन सर्व संचालकांचे दिपकआबांनी विशेष कौतुक आणि अभिनंदन केले. या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलाचे संचालक शंकर चौगुले व २५ वर्षांपासून सोसायटीचे चेअरमन असलेले दिगंबर करांडे पराभूत झाले.

             महिम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत कर्जदार मधून श्रीकांत चौगुले, बाळासाहेब घोगरे, हनुमंत कारंडे, विष्णू बंडगर, गणपत पाटील, गणपत मरगर, नागनाथ लवटे व विठ्ठल कारंडे तर महिला प्रतिनिधी म्हणून सिंधू नानासाहेब चौगुले व शकुंतला भिवा शिरगिरे मागासवर्गीय मधून संदीप शेंडे भटक्या विमुक्त मधून दादासाहेब कोळेकर तर अनुसूचित जाती जमाती मधून सुरेश लक्ष्‍मण महापुरे हे शेतकरी परीवर्तन आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून आले आहेत. महिम सोसायटीच्या नुतन सर्व संचालकांनी सोमवार दि 23 रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सर्व नूतन संचालकांचा सत्कार केला व सोसायटीचा कारभार सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी सभासदांच्या हितासाठी करण्याचा नूतन संचालकांना सल्ला दिला. गावातील सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्यावर सोसायटीची जबाबदारी दिली आहे सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून सर्व संचालकांनी सोसायटीचा कारभार करावा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू असा विश्वासही यावेळी दिपकआबांनी उपस्थित सर्व संचालकांना दिला. यावेळी सर्व नूतन संचालक तसेच गावातील बिभीषण पाटील, सिताराम नारनवर, दत्तात्रय घोगरे, सिताराम शिरगिरे, नानासाहेब जालिंदर बंडगर, सोमनाथ मरगर, संतोष चौगुले शांतिनाथ घोगरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages