पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असताना दुधाचे दर मात्र कमी केले जात आहेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असताना दुधाचे दर मात्र कमी केले जात आहेत

पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असताना दुधाचे दर मात्र कमी केले जात आहेत

            सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दूध उत्पादनातील शुष्क काळ (कमी उत्पादन) सुरू असतानाही राज्यातील दुधाचे खरेदी दर गेल्या दहा दिवसांमध्ये दोनदा कमी करण्यात आले आहेत. एकीकडे पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असताना दुधाचे दर मात्र कमी केले जात आहेत. राज्यातील खासगी दूध संस्थांच्या साखळीसमोर सामान्य दूध उत्पादक हतबल झाला आहे.गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. या काळामध्ये खासगी संस्थांनी गाईच्या दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर १७ रुपयांपर्यंत खाली आणले. आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे दिसत होती. गेल्या चार महिन्यांमध्ये दुधाच्या दरांमध्ये सुधारणा होत होती. वास्तविक हा काळ दूध व्यवसायात शुष्क काळ म्हणजे या कालावधीमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते. उत्पादन कमी होत असले तरी उन्हाळ्यात दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम यासारख्या दुग्धजन्य पदार्थांना मागणी मात्र वाढते. यामुळे या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे दुधाचे दर हे वाढतच असतात. ऑगस्ट शुष्क काळ चालतो. त्यानंतर म्हशींच्या विणीचा हंगाम सुरू होतो. बाजारात दुधाची उपलब्धता वाढते आणि दर घसरण्यास सुरुवात होते. यंदा ऐन मे महिन्यात राज्यातील खासगी दूध संस्था दूध खरेदी दरात कपात करत आहेत. ५ मे रोजी दुधाच्या दरात १ रुपया कपात करण्यात आली. त्यानंतर लगेचच १५ मे रोजी आणखी एक रुपया कपात करण्यात आली. सामान्य उत्पादकांची आर्थिक अडचण होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages