प्राथमिक शिक्षकांचे पदोन्नतीसह विविध प्रश्न लवकरच मार्गी लावू - डॉ. किरण लोहार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 25, 2022

प्राथमिक शिक्षकांचे पदोन्नतीसह विविध प्रश्न लवकरच मार्गी लावू - डॉ. किरण लोहार

प्राथमिक शिक्षकांचे पदोन्नतीसह विविध प्रश्न लवकरच मार्गी लावू - डॉ. किरण लोहार

               सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पदोन्नतीसह दीर्घकाळ रखडलेले विविध प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली.जिल्हा शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात दोन हजार शिक्षक बांधवांनी सहभाग नोंदवून जिल्हा परिषदेतील दफ्तरदिरंगाई विरोधातील असंतोषाला वाट करून दिली.शिक्षक समितीने वारंवार पाठपुरावा करूनदेखील विस्तार अधिकारी-केंद्रप्रमुख पदोन्नती, समायोजन, टंचाई काळातील शालेय पोषण आहाराचे मानधन, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, एनपीएस खात्यांवरील रकमांचा हिशेब, सेवापुस्तक पडताळणी असे अनेक प्रश्न दीर्घकाळ काही प्रश्न रखडले आहेत, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक समितीने धरणे आंदोलन पुकारले होते.यावेळी डॉ.लोहार यांनी पूनम गेटवर येऊन आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेतली.विज्ञान विषय शिक्षक नियुक्ती व  समाजशास्त्र विषय शिक्षक नकार हा प्रश्न १० जूनपूर्वी निकालात काढण्यासाठी प्रक्रिया राबविली जाईल तसेच विस्ताराधिकारी पदोन्नती आदेश त्वरित निर्गमित करणार असून ३१ मे अखेर रिक्त होणारी पदेदेखील जूनमध्ये तत्काळ भरण्यात येतील,अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार, रंगनाथ काकडे, ज्योती कलुबर्मे,राजन ढवण, शरद रूपनवर, विनोद परिचारक, सुनील अडगळे, बलभीम जाधव यांनी मनोगते व्यक्त केली तर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राम शिंदे,प्रशांत लंबे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages