डी.के.मागासर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- घरची परिस्थिती नाजूकच वडिलांचे तुटपुंजे मुलाचे सुरू शिक्षण अशात एकुलत्या एक मुलीच्या विवाहाच्या खर्चाची धाकधूक दररोज वाटत असतानाच अचानकपणे ध्यानीमनी नसताना मोठ्या थाटामाटात अन् डोळ्याचे पारणे फेडणारा भव्यदिव्य मुलीचा विवाह सोहळा पाहून आईचे डोळे पाणावले. हे सारं चित्र होतं सोलापुरातील डी. के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिसरण पंचशीलग्रहण करून विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. या विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे, डी. के.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, नगरसेवक किरण देशमुख,सुप्रियाताई बनसोडे, संजय कोळी,अनंत जाधव, राजाभाऊ पाटील बापूसाहेब जगताप, अजित गायकवाड,गुरुशांत धुत्तरगावकर, पुरुषोत्तम बरडे तौफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळा यशस्वीतेसाठी हनुमंत कसबे, धीरज माने, सतीष वाघमारे, बापू सदाफुले, शशिकांत शिरसट, संतोष जानराव, किरण डोळसे, भालचंद्र साखरे, चांगदेव सोनवणे, दीपक
बारशिंगे, उत्तम कसबे, महादेव सोनकांबळे, दीपक गायकवाड, अनिल बेळ्ळे, पिंटू कोळेकर, विकास निकाळजे, पिरू माने, संघा बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments